दारूच्या दुकानाचा व्यवसाय सुरू होऊ नये म्हणून आखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे यवत पोलीस स्टेशनला निवेदन

कुरकुंभ,सुरेश बागल

यवत (ता. दौंड ) येथे  आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दौंड तालुका यांच्या वतीने दारूच्या दुकानाचा व्यवसाय सुरू होऊ नये म्हणून यवत पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत क्र.१ व २ व विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेच्या उत्तर बाजूस रायकर मळा रोड लागत एक या नवीन अपारमेंट मधील तळ मजल्या मध्ये माधव रेस्टॉरंट & बार हा व्यवसाय सुरू होत असून सदरचा व्यवसाय हा तिन्ही शाळेच्या शेजारी असून भर लोकवस्ती मध्ये सुरू होत असल्याने या व्यवसायामुळे शाळेच्या मुला-मुलींना तसेच आसपास स्थानिक रहिवाशांना या व्यवसायाचा त्रास होणार आहे.तरी दारूचा व्यवसाय सुरु होण्यास सर्व ग्रामस्थांच्या वतीने व आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला.सदरचा व्यवसाय सुरू करू नये अशी विनंती करण्यात आली .दारूचा व्यवसाय सुरू झाल्यास सर्व ग्रामस्थांच्या वतीने व आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा आदेश देण्यात आला आहे.

महिलावर्ग आणि नागरिकांकडून दारूच्या दुकानाची पाटी काढून टाकण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशनला यवत गावचे उपसरपंच श्री सुभाष बाप्पू यादव, ग्रामपंचायत सदस्य सौ .मनीषा सोमनाथ रायकर, शिवसेना अध्यक्ष श्री .अशोक दादा दोरगे,आर पी आय मातंग आघाडी दौंड तालुका अध्यक्ष श्री. संजय अडागळे श्री .सुरज चोरगे , श्री सोमनाथ रायकर , गणेश भुजबळ , समता परिषद दौंड ता. कार्याध्यक्ष मंगेश रायकर, महिलावर्ग आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous articleराज्यात २०२१ मध्ये कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये कौशल्य विकास विभागामार्फत २.१९ लाख जणांना रोजगार; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
Next articleदुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला