पाटेठाण ला सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर मंजूर

Ad 1

दिनेश पवार-दौंड-(प्रतिनिधी)

पाटेठाण (ता.दौंड) येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर मंजूर करण्यात आली आहे, महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत या विहिरीचे काम होणार आहे,माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष-वैशाली नागवडे,जिल्हा परिषद सदस्य-गणेश कदम,माजी उपसभापती -सुशांत दरेकर यांच्या प्रयत्नातून व पंचायत समिती दौंड तर्फे प्रस्ताव पाठवण्यात आला होता यास मंजुरी मिळाली आहे,या कामासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रासाद यांनी 5लाख 69 हजार 373 रुपये मंजूर केले आहेत.

या कामाचे भूमिपूजन माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी  जिल्हापरिषदेचे सदस्य-गणेश कदम,माजी उपसभापती-सुशांत दरेकर,सरपंच-ज्योती यादव,उपसरपंच-अश्विनी हंबीर,पै.संदीप हंबीर,माजी उपसरपंच-गोविंद यादव,माजी उपसरपंच-ज्योती झुरुंगे,पुरुषोत्तम हंबीर,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते