जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा उपक्रम

नारायणगांव,किरण वाजगे

योगामध्ये अफाट शक्ती असुन जागतिक समस्येचे निराकरण, साथीचे आजार दुःख, भ्रष्टाचार, असंतोष याचे निराकरण करण्याचे सामर्थ्य योगामध्ये दडलेले आहे. युवकांमध्ये आरोग्य व राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करणे गरजेचे आहे तसेच भारत सरकारच्या उपक्रमाच्या माध्यमातुन ही संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन जयहिंद शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी केले.

कुरण येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, क्रीडा मंत्रालय, पतंजली योगपीठ, गीता परिवार, संस्कृती व सुरक्षा मंत्रालय त्याचप्रमाणे राष्ट्रीय योगासन क्रीडा प्रबोधिनी, विद्या भारती, क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा उपक्रम ०५ जानेवारी २०२२ ते २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.

या उपक्रमास प्रतिसाद म्हणून जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्रथम वर्ष विभाग द्वारे विद्यार्थ्यास सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ०५ जानेवारी पासून झालेली आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी जे गरकल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ डी एस गल्हे, संचालिका शुभांगी गुंजाळ, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ.आर.एम. मुळजकर, प्रा. आर. एल. मानकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. ए. गाडेकर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रम महाविद्यालयात ०५ जानेवारी २०२२ ते २३ फेब्रुवारी २०२२ फेब्रुवारीपर्यंत रोज चालू राहणार आहे. या उपक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना व प्रथम वर्ष विभाग यांनी केले .

Previous articleजयहिंद शैक्षणिक संकुलात २७५ विद्यार्थ्यांचे लसीकरण
Next articleग्रामोन्नती मंडळाच्या श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश