दिव्यांगांच्या रोजगारासाठी ‘प्रहार’चे धर्मेंद्र सातव यांची कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई

राजगुरूनगर – महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या रोजगारांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर एका पायाने सर करून सरकारला आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यास भाग पाडले आहे. नैसर्गिक व्यंगावरून खाजगी क्षेत्रात रोजगार नाकारला जात आहे. अपंगांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणीही दिव्यांगांना रोजगार नाकारू नये.

मनुष्य शरीराने नाहीतर कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरतो.महाराष्ट्रात १० टक्के दिव्यांग व्यक्ती असून, त्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे.दिव्यांग हा सुद्धा समाजाचा एक घटक आहे.त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यांसाठी दिव्यांगामध्ये असलेल्या सुप्त कौशल्याचा विचार करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडवला पाहिजे.

अशी मागणी धर्मेंद्र सातव यांनी कळसुबाई शिखर सर केल्यानंतर महाराष्ट्र शासनाला दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.यावेळी बापू कोकरे, हरी सूर्यवंशी,दादा काळोखे हे बांधव उपस्थित होते.

Previous articleराजश्री शाहू महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या माजी विद्यार्थीनी कॅन्सरचे लक्ष्मीतरु वृक्ष लागवड करून स्नेहसंमेलन केले साजरे
Next articleजयहिंद शैक्षणिक संकुलात २७५ विद्यार्थ्यांचे लसीकरण