राजश्री शाहू महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या माजी विद्यार्थीनी कॅन्सरचे लक्ष्मीतरु वृक्ष लागवड करून स्नेहसंमेलन केले साजरे

अमोल भोसले,उरुळी कांचन

राजश्री शाहू महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांचे जेधे मोरे वस्तीगृहचे पर्वती पुणेचे माजी विद्यार्थी यांनी कॅन्सरचे लक्ष्मीतरु वृक्ष लागवड करुन साजरे केले. पंचवीस वर्षांनंतर स्नेहसंमेलन कामठे रिसॉर्ट भांडगाव (ता.दौंड) येथे संपन्न झाले.

यावेळी शाश्वत विकास फाउंडेशन अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्यातर्फे लक्ष्मीतरु वृक्ष बाहुउपेगी भेट देण्यात आली. उद्योगपती राजुशेठ ताकवणे यांनी गेले दोन महिन्यापासून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्र केले आहे. काही युपी एमपी मधील आले होते या विद्यार्थ्यांना एकत्र करुन या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन केले.

विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे सामाजिक व राजकीय सोशल वर्क शासकीय अधिकारी शेतकरी उद्योजक नर्सरी क्षेत्रातील अनेक नामवंत कंपनीमध्ये चांगल्या पोस्टला काम करतात शासकीय नोकरदार आयकर विभाग सीए सरपंच मध्ये काम करणारे शेतकरी या सर्वांना माजी शेकडो विद्यार्थी एकत्र येऊन सर्वांना खूप मोठा आनंद झाला तशीच गेली पंचवीस वर्षांपूर्वी सर्व विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप गरीब मधील होती. पण आज चांगल्या पद्धतीने उद्योजक म्हणून काम करत आहोत दरवर्षी अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्नेह संमेलन व वृक्षरोपण घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या वेळी अनिल जगताप, रामदास काळभोर, उदय देशमुख, राजेश पाटील, उमेश भोसले, के के देशमुख, शिवाजी सोनवणे, इतर अनेक जण उपस्थित होते.

Previous articleदौंड पोलीसांच्या नाकाबंदीमुळे दुचाकी चोर अटकेत
Next articleदिव्यांगांच्या रोजगारासाठी ‘प्रहार’चे धर्मेंद्र सातव यांची कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई