विरोधकांचे आरोप वैफल्यग्रस्तातून-उपसरपंच जया दजगुडे

Ad 1

राजगुरुनगर:शिरोलीच्या उपसरपंच सौ जया काळूराम दजगुडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे राजकीय वैमनस्यातुन करण्यात आल्याची माहिती शिरोलीच्या उपसरपंच सौ जया दजगुडे यांनी दिली.

नुकतेच शिरोलीचे माजी उपसरपंच जितू वाडेकर व सदस्य विजय सावंत, गणपत थिगळे, संदिप वाडेकर, सौ उर्मिला सावंत सौ सोनाली सावंत यांनी शिरोली गावच्या उपसरपंच सौ जया दजगुडे यांनी धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला असा आरोप करून तक्रात दाखल केली होती परंतु वाढदिवस हा कुठल्याही प्रकारे धुमधडाक्यात साजरा केलेला नसून शासनाचे नियम पूर्णपणे पाळून साजरा केला आहे परंतु राजकिय आकसापोटी व नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने असे खालच्या पातळीचे आरोप करण्यात आले आहेत..
विशेष म्हणजे ज्या सदस्यांनी तक्रार दाखल केली त्यातील काही सदस्य हे वाढदिवस साजरा करताना उपस्थित होते त्यामुळे केलेली ही तक्रार ही केवळ स्थानिक राजकारणातून केल्याचे सिद्ध होत आहे..