पांढरेवाडी येथे क्रातीज्योति सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी

कुरकुंभ,सुरेश बागल

पांढरेवाडी ( ता. दौंड ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्योलीत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व नंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला

 यावेळी शालेय मुलांची सावित्रीबाई विषयी भाषणे झाली तसेच स्वरा योगेश भागवत ( वय ७ वर्षे ) हिने क्रिडा क्षेत्रात १४२ कि. मी .सायकलिंग ,५० प्रकारच्या दोरी उड्या, १ मिनिटात १०० पुषप काढणे,कुस्ती, रनिंग, पोहणे या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तीची ऑल इंडिया गिनीज बुक नोंद झाल्याबद्दल तिचा सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षिकांचा सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श शिक्षिका म्हणून आलका भागवत ,भीमाबाई चव्हाण,दिपाली चव्हाण,निर्मला झगडे यांना दिला तसेच मुलींना शिक्षण, कला, क्रिडा विषयात प्रोत्साहित करणाऱ्या मातांना आदर्श माता म्हणून राणी भागवत, सरस्वती झगडे यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे ,चांडाळ चौकटी च्या फेम वेबसिरीज अण्णा लोणकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी पांढरेवाडी गावचे सरपंच छाया नानासो झगडे,उपसरपंच रोहिणी बनकर,तंटामुक्त अध्यक्ष बाळकृष्ण भागवत, पोलीस पाटील विलास येचकर,शाळा व्यवस्थापन कमिटी अर्पणा निंबाळकर,ग्रा.स.पदमाताई गायकवाड, माजी सरपंच नितीन जाधव, संदीप जगताप, माजी सरपंच तात्यासाहेब शितोळे, सुरेश निंबाळकर,भिकाजी भागवत, राजेंद्र भागवत, सचिव राहुल झगडे तसेच माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल झगडे ,आर. पी. आय. युवक दौंड तालुका अध्यक्ष नवनाथ गायकवाड , नानासाहेब झगडे ,विकास झगडे आणि महिला आणि ग्रामस्थ कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील विलास येचकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी बिडवे तर आभार मुख्याध्यापक मच्छिंद्र रामगुडे यांनी केले.

Previous articleसांदण दरीतून मराठी पत्रकारीतेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Next articleराजगुरूनगर मध्ये माॕसाहेब मिनाताई ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन