श्री संत सटवाजी बाबा महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

राजगुरूनगर – पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गुळाणी (ता.खेड) येथील श्री संत सटवाजी बाबा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाची सांगता ह.प.विकासानंद महाराज मिसाळ याच्या काल्याच्या किर्तनाने झाली.सात दिवस आयोजित केलेल्या सप्ताहात हरिजागर, प्रवचन,पारायण व किर्तनाचे धार्मिक कार्यक्रम झाले.

सटवजीबाबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्या मध्ये असल्याने या परिसरात विकास कामे सुरू आहेत.येणाऱ्या भाविकांना सुविधा व मंदिर परिसरात धर्मशाळेचे काम प्रगती पथावर आहे.

यावेळी पुणे व खेड तालुक्यातून आलेल्या भाविकांच्या साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युवा नेते विजय शिंदे व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बापूसाहेब थिटे, सरपंच व सुकर्ता ग्रुपचे संचालक ज्ञानेश्वर ढेरंगे ,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप ढेरंगे ,उद्योजक माऊली ढेरंगे ,सर्जेराव पिंगळे ,राम महाराज रोडे,भिका ढेरंगे , माऊली पिंगळे, हनुमान रोडे ,सुनील तांबे , नवनाथ ढेरंगे ,भरत वायाळ ,यशवंत पिंगळे, विलास ढेरंगे, संदीप पिंगळे ,नाथा पिंगळे , चेतन पिंगळे व भाविक उपस्थित होते.

Previous articleसमाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं – अजित पवार
Next articleफॉरेनर असल्याचे भासवून दोन भाबट्यांनी मोबाईल शॉपी दुकानदाराला ४६ हजाराचा घातला गंडा ; घटना सीसीटिव्हित कैद