क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना “खेतोबा” हून वंदन

राजगुरूनगर – ३ जानेवारी, क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत राजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी “भोरगिरी-खेतोबा-भोरगिरी” ही २० किलोमीटरची पदभ्रमंती मोहीम हाती घेत खेतोबा मंदिरासमोर सावित्रीबाई फुलेंना वंदन करीत केलेली ही मोहीम सामाजिक बदल घडविणाऱ्या सावित्रीच्या लेकींना समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात कोटेश्वर मंदिर, भोरगिरी, ता. खेड, जि. पुणे येथून झाली. डाव्या बाजूच्या पाऊल वाटेने जात पहिला पूल ओलांडून एक छोटा जंगल टप्पा ओलांडल्यावर पुन्हा एक पूल ओलांडून खड्या चढाईचा मार्ग येळवली ला घेऊन जातो.

येथून पुढे कमला देवी मंदिराच्या येथून डावी कडे जावे लागते. येथून एक घनदाट जंगलातील एक टप्पा पार केल्यावर पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगड मांडून केलेल्या पायवाटेने सुमारे पाऊण तासांची पायपीट करावी लागते. मग एका ठिकाणी ही दगड असलेली पाऊल वाट सोडून उजव्या बाजूला गेल्यावर सुमारे १५ मिनिटात कड्याच्या टोकावर असलेले खेतोबा मंदिराचे दर्शन होते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा घनदाट जंगलातील २० किलोमीटरचा पदभ्रमंती मार्ग, चकवा देणाऱ्या पाऊलवाटा, धुक्यात हरवलेला परिसर, हुडहुडी भरवणारी थंडी अश्या सर्वानी आव्हानांना सामोरे जात स्वप्नील पाटील आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleटीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सची साहसी “डायनासस्कॉर” मोहीम फत्ते : तीन दिवसात ५ सुळके सर करून केली विक्रमी कामगिरी
Next articleखळबळजनक! पुण्यात पोलिसानेच दिली पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी