टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सची साहसी “डायनासस्कॉर” मोहीम फत्ते : तीन दिवसात ५ सुळके सर करून केली विक्रमी कामगिरी

राजगुरूनगर-सह्याद्रीच्या खोऱ्यातील  प्रस्तरारोहणासाठी कठीण श्रेणीत गणले जाणारे नाशिक जिल्ह्यातील स्कॉटिश कडा, पहिणे नवरा नवरी सुळका, संडे वन आणि डांग्या सुळका तीन दिवसात सर करीत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सने “डायनासस्कॉर” मोहीम फत्ते करीत एक नवा विक्रम केला आहे.

या मोहिमेत २८ डिसेंबर ला १८० फुटी डांग्या सुळका आणि २६० फुटी पहिणे नवरी सुळका प्रस्तरारोहण करीत सर करण्यात आला तर २९ डिसेंबर ला २६० फुटी पहिणे नवरा सुळका आणि २८० फुटी संडे वन सुळका सर करण्यात आला. ३० डिसेंबरला सर्वाधिक कठीण कडा म्हणून ओळख असलेला आणि खुप कमी गिर्यारोहकांनी प्रस्तरारोहण करून सर केलेला ५५० फूटी स्कॉटिश कडा सर करीत विक्रमी कामगिरी केली.

सलग तीन दिवस शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणाऱ्या अति कठीण ९० अंशातील सरळसोट प्रस्तरारोहण मार्ग, चुकीला माफी नाही अशी ही ठिकाणे, निसटणाऱ्या खडकांपासून योग्य काळजी घेणे, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या(नाशिक) जॉकी साळुंखे, चेतन शिंदे, रोहित पगारे, विशाल बोडके आणि सहाय्यक संघात असणाऱ्या ज्ञानो ठाकरे, पुजा साळुंखे आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढचे पाऊल पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
Next articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना “खेतोबा” हून वंदन