अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढचे पाऊल पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

दिनेश पवार,दौंड

वेगवान स्पर्धेच्या युगात इच्छा असो वा नसो, काळाच्या प्रवाहात टिकून रहायचे असेल तर नव्या रणांगणात आपण उतरले पाहिजे, विज्ञान युगात आपले स्थान कोठे आहे,याचा आपण विचार केला पाहिजे, त्यासाठी समाजाने स्थितीवादी होण्यापेक्षा गतिवादी झाले पाहिजे,या संकल्पनेतून मा, राजेंद्र कोंढरे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आजचा निश्चय,पुढचं पाऊल,या पुस्तिकेची मांढणी केली, त्याचा प्रकाशन सोहळा कांचन लॉन्स, यवत येथे संपन्न झाला.

युवकांना व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यात मदत करण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी प्रसंगी नंदू अगताप,आदिनाथ थोरात,प्रसाद गायकवाड, दादा नांदखिले, संजय थोरात, राहुल शेळके, अतुल आखाडे, स्वप्नील घोघरे, दत्तात्रय नागवडे,कैलास दोरगे, दीपक गाढवे,उमेश वीर, गणेश काकडे, विक्रम पवार, आशिष शिंदे, विकास जगदाळे, शैलेंद्र पवार, देवेंद्र आवचर,संदीप जगताप,सोमनाथ लवंगे,प्रताप खानविलकर, रोहन घोरपडे, श्रीकृष्ण साठे, हरिभाऊ काळे,राजू ढाने, वैभव जठार, प्रथमेश जगदाळे, गोरख जाधव उपस्थित होते.

Previous articleचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून
Next articleटीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सची साहसी “डायनासस्कॉर” मोहीम फत्ते : तीन दिवसात ५ सुळके सर करून केली विक्रमी कामगिरी