राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  अपंग सेल च्या तालुकाध्यक्ष पदी शांतीलाल गिरमकर यांची निवड

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अपंग सेल च्या दौंड तालुका अध्यक्ष पदी शांतीलाल नामदेव गिरमकर यांची निवड करण्यात आली,पुणे जिल्हा अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष-दिपक भगवान राऊत यांनी निवडीचे पत्र दिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,मा. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारण करत असल्याने गिरमकर यांची निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील,जिल्हाध्यक्ष-मा.प्रदीप गारटकर,माजी आमदार-मा.रमेश आप्पा थोरात, तालुका अध्यक्ष-आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य-मा.वीरधवल बाबा जगदाळे, मा.अमितदादा गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील  अपंगाचे प्रश्न,त्यांचे हक्क,त्यांच्या साठी असणाऱ्या शासकीय सुविधा मिळवून देवून या सेल मध्ये भरीव कामगिरी करणार असल्याचे शांतीलाल गिरमकर यांनी सांगितले, या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत