सुरेश बागल सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार

कुरकुंभ-पत्रकार सुरेश शंकर बागल यांनी आपल्या ३४ व्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील अनाथ मुलांची, सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळा येथे १५ डझन वह्या,३० कंपास व थंडीपासून ऊब मिळावी म्हणून ६ सतरंज्या अशा शालोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सुरेश बागल हे पुणे जिल्ह्यातील पांढरेवाडी गावचे पत्रकार ,रक्तदाता व सामाजीक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सध्या पोर्टल आवाज जनतेचा कुरकुंभ प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहेत. कुरकुंभ पासून घारगाव हे अंतर ५० की. आहे.परंतू अंतर जास्त का असेना पण मदत ही गरजू व अनाथ मुलांसाठी झाली पाहिजे एक मुलाचे सांभाळणे अवघड आहे या शाळेमध्ये१६५ मुलांना खामकर सर अनाथ मुलांना सांभाळतातही अवघड बाब आहे असे बागल यांनी सांगितले आहे.

सामाजिक काम करणारी व्यक्ती भरपूर आहेत पण अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मदत करणारे असे एकमेव पत्रकार सुरेश बागल आहेत.स्थानिक ठिकाणापासून ५० कि. अंतरावर जाऊन आणि वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ व गरजू मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन त्यांच्या बरोबर वेळ घालवणे ही सगळ्यात मोठी बाब आहे.सामाजिक भान ठेवून समाजात राहून समाजासाठी आपण मोठे काम केले हे कौतुक करेल तेवढे कमीच आहे. -पोपटराव खामकर
सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले,माध्यमिक निवासी शाळा घारगाव( ता. श्रीगोंदा) संस्थापक अध्यक्ष

 सुरेश बागल यांनी लहान मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केल्याने अनाथ मुला -मुलींकडून कडून स्वागत करण्यात आले शिक्षक वर्ग यांच्याकडून कौतुक करण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष पोपटराव खामकर यांच्याकडून सत्कार करून आभार मानण्यात आले.

यावेळी दौंड तालुका शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हरेश ओझा, सामाजिक काँग्रेस चे कार्यकर्ते विठ्ठलराव शिपलकर ,मेल्झेर कंपनीचे अधिकारी हनुमंत सुतार,नवनाथ जगताप, रवींद्र जाधव , कोळगावचे राहुल तोंडे उपस्थित होते. बागल यांच्या मित्रपरिवाराणे कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे निवासी शाळेकडून पुष्पहार देऊन शिक्षकांकडून सत्कार करण्यात आला आहे.

शासनाचे अनुदान मिळणे गरजेचे आहे.या शाळेत आजपर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे आहेत. या शाळेत १ ली ते १० वी पर्यंतचे वर्ग सुरू आहे. या शाळेतशिक्षणाबरोबर कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाते. आजही या शाळेत एकूण २६५ विद्यार्थी याचा लाभ घेत असून त्यांच्या शिक्षणासाठी प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचरार्यांची नियुक्ती केली आहे. कोरोना आजारामुळे सध्या ६० मुले आहेत थोडया दिवसात मुलांचे प्रमाण वाढले जाईल. या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांकडून कोणत्याही प्रकारची फी किंवा देणगी घेतली जात नसून त्यांना विनामूल्य विनामूल्य प्रवेश दिला जातो. या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची मान्यता आहे . परंतू शासनाने कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. त्यासाठी संस्थेने गेले १८ वर्षांपासून स्वबळावर व सामाजिक मदतीतून या मुलांची राहण्याची, जेवणाची,शिक्षण, आरोग्य इत्यादी सुविधा पुरवित आहे.असे घारगाव निवासी शाळेतील संस्थेचे अध्यक्ष पोपटराव खामकर यांनी सांगितले .

Previous article‘थर्टी फर्स्ट’ला भिमाशंकर परिसरात नाकाबंदी
Next articleब्लेडने वार करून गॅरेजवाल्याला लुटले; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल