नांदेडचा साईनाथ शरद सह्याद्री वक्तृत्व स्पर्धेत विजेता

दिनेश पवार,दौंड

नायगाव एज्युकेशन सोसायटी,मुंबई चे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय शरद सह्याद्री वक्तृत्व स्पर्धेत यशवंत कॉलेज नांदेड चा साईनाथ नामदेव महादवाड यांनी प्रथम,कला वाणिज्य महाविद्यालय वारजे चा आशुतोष पृथ्वीराज निकम द्वितीय,आनंद कांबळे सिंहगड कॉलेज पुणे तृतीय, दत्तात्रय चोरमले छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा चतुर्थ,पराग बदीरके यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे पंचम असे अनुक्रमे पारितोषिक मिळवले तर दहा स्पर्धकांना प्रोत्साहन पर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे,मुंबई, सातारा, नांदेड,ठाणे,सांगली,इस्लामपूर, गडहिंग्लज,वर्धा,औरंगाबाद, नाशिक आदी जिल्ह्यातील एकूण 35 स्पर्धक सहभागी झाले होते,या स्पर्धेत पावसातला सह्याद्री, सह्याद्रीतला पाऊस,दीडशे कोटी मेंदू,तीनशे कोटी हात तरी अधिराज्य गाजवतात धर्म आणि जात,विश्व मांगल्याची सुगंधी प्रार्थना पसायदान, मानवतेचा जाहीरनामा भारतीय संविधान, ऑनलाईनच्या शोधात माणूसच ऑफलाईन हे विषय देण्यात आले होते.

या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, प्रदेश युवक सचिव राष्ट्रवादी चे कॅप्टन निखिल जाधव यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य माऊली उद्योग समूहाचे संदीप हंबीर,दौंड तालुका नागरी पतसंस्था चे चेअरमन श्रीराम यादव,सचिन कोऱ्हाळे, ह. भ.प.किशोर महाराज लडकत,पोपट भुजबळ,चैतन्य पाटोळे,प्रदीप दिवेकर यांचे सहकार्य लाभले,महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत ढेकणे व विद्यार्थी विकास प्रमुख प्रा.सुनील वाघ यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्रवीण शिंदे,प्राचार्य राजेंद्र थोरात यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.पांडुरंग बिडकर,प्रा.महेश माने, प्रा.तुकाराम सांगळे(राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख),प्रा.व्यंकट वडगावे,प्रा.महेश गावडे,प्रा.प्रसाद कुलकर्णी, प्रा.बबन माने,प्रा.बाळासाहेब जगताप, प्रा. दत्तात्रय खोमणे,प्रा.महेश साळवे, प्रा.संतोष ढवळे,प्रा.भारतीबाई पवार,प्रा.कांता सस्ते,प्रा.मोमीन तसनीम,प्रा.सीमा डोके,प्रा.ज्योती शिंदे,प्रा.अर्चना गायकवाड, प्रा.रेश्मा पठाण,सर्व प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले

Previous articleडिलिव्हरी बॉयची ग्राहकाला लाकडाच्या दांडक्याने मारहाण
Next articleमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मंत्रालयात माहीती आणि आरक्षण केंद्र