दौंड-कोरोनामुळे मुत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्याची पुरोगामी पत्रकार संघाची तहशीलदारांकडे मागणी

Ad 1

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात असताना आपलं कर्तव्य म्हणून पत्रकार बांधव सुध्दा देश सेवा करीत आहेत,कोरोनाची लागण झाल्यामुळे लातुर जिल्ह्यातील पत्रकार गंगाधर सोमवंशी व गेवराई जि.बीड येथिल पत्रकार संतोष भोसले यांचे निधन झाले आहे, शासनाने या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्यावी यासाठी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दौंड तहसिलदार संजय पाटील व नायब तहसिलदार सचिन आखाडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा संघटक राजेंद्र सोनवलकर, दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम,कार्यध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष शफिक मुलाणी, सचिव हरिभाऊ क्षिरसागर, कायदेविषयक सल्लागार अँड.विजयकुमार जोजारे, सहसचिव विक्रम साबळे, संघटक रमेश चावरिया, सहसंघटक सुरेश बागल, खजिनदार कैलास जोगदंड,सह खजिनदार विठ्ठल शिपलकर, प्रसिद्धी प्रमुख प्रदिप सुळ,सह निलेश शेंडे,राजु सय्यद, सुनिल नेटके सर,प्रमोद कांबळे सर,विजय जाधव,आदि पत्रकार उपस्थित होते.