गाडी बाजूला काढा म्हटल्याने घरात घुसून केलेली जबर मारहाण ; सात जणांवर गुन्हा दाखल

घोडेगाव – घराच्या कामासाठी आणलेला माल नेण्यासाठी रस्त्याच्या मध्ये लावलेली गाडी काढा असे म्हटल्याने घरात घुसून आजारी नवरा-बायको व त्यांच्या मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना ठाकरवाडी चास (ता.आंबेगाव) येथे ( दि.२०) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.याबाबत सात जणांवर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी महिलेच्या घराचे काम सुरू असून (दि. २०) रोजी त्यांच्या घराच्या कामासाठी बांधकामाचे साहित्य घेऊन गाडी आली होती. त्यावेळी रस्त्यामध्ये संतोष सुदाम बारवे याने त्याची वॅग्नर गाडी व सायकल रस्त्यात लावली होती. त्यावेळी फिर्यादी महिलेने ची गाडी काढण्यासाठी सांगितले असता संतोष बारवे याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करत गाडी काढली नाही. त्यावेळी फिर्यादीने कामगारांच्या मदतीने सामान वाहून कामावर नेले. त्यानंतर सायंकाळी फिर्यादी महिला तिचे पती व मुलगी घरात चालू घराचे कामा बद्दल चर्चा करत असताना त्यांच्या शेजारी राहणारा संतोष बारवे यांनी घरातून फिर्यादीच्या मुलीस गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादीच्या मुलीने तुम्ही शिवीगाळ करू नका असे म्हणाली असता संतोष याने फिर्यादीच्या घरात घुसून तुमच्यात दम असेल तर बाहेर या मग बघतो असे म्हणाला त्यावेळी फिर्यादीच्या मुलीने आईची तब्येत ठीक नाही त्याचे ऑपरेशन झाले आहे वडिलांना सोयरासिसचा त्रास आहे तुम्ही विनाकारण आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जा असे म्हणाली असता संतोष बारवे याने मुलीला धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी महिला भांडण सोडवण्यासाठी गेली असता संतोष यांने गळा दाबून फिर्यादी महिलेला दरवाजावर जोरात ढकलून दिले. त्यावेळी फिर्यादी महिला खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच फिर्यादी महिलेचे पती त्यावेळी मोबाईल मध्ये शूटिंग काढण्यासाठी गेले असता त्याचाही मोबाईल हाताला हिसका देऊन पाडून फोडला आहे. फिर्यादी महिला खाली पडल्याने तिला मुलगी व पती ने उठवून पायरीवर बसवले असता त्यावेळी बाळू सुदाम बारवे, भागुजी देवराम बारवे, सुदाम कोंडाजी बारवे, मंजुळा सुदाम बारवे, अर्चना संतोष बारवे, रोहिणी बाळु बारवे, ( सर्व रा. ठाकरवाडी ता. आंबेगाव जि. पुणे ) त्या ठिकाणी आले व त्यांनी फिर्यादीच्या पती कांताराम बारवे यांना हातातील काठीने मारहाण केली. तसेच संतोष बारवे यांनी फिर्यादी महिला व त्यांच्या मुलीला अतिशय अश्लील भाषेत बोलत मारहाण केली आहे.

या बाबत अरुणा कांताराम बारवे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संतोष सुदाम बारवे, बाळू सुदाम बारवे, भागूजी देवराम बारवे, सुदाम कोंडाजी बारवे, मंजुळा सुदाम बारवे, अर्चना संतोष बारवे, रोहिणी बाळू बारवे ( सर्व रा.ठाकरवाडी चास ता.आंबेगाव पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याच्या मनीषा तुरे करत आहेत.

Previous article३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
Next articleखळबळजनक – चाकणमध्ये एकाला ८५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे फरार