अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध:एकावर गुन्हा दाखल

आ़ंबेगाव- तालुक्यातील थोरांदळे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून तुषार तुळशीराम फुटाणे (वय २३, रा. थोरांदळे) याच्या विरोधात मंचर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,फुटाणे याने ‘‘आपण दोघे लग्न करू व बाहेर कोठेतरी निघून जाऊ.’’ असे म्हणून तिला मोटर सायकलवर बसवून पळवून चास (ता. खेड) येथील त्याच्या मावशीच्या घरी नेले. तेथे ता. २६ डिसेंबर रोजी तिच्या मनाविरुद्ध संबंध प्रस्थापित केले. याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार पुढील तपास करत आहेत.

Previous articleअज्ञात वाहनाच्या धडकेत १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू
Next article३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी