अज्ञात वाहनाच्या धडकेत १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू

बारामती – तालुक्यातील मोरगाव येथे तीन महाविद्यालयीन युवतींचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला . या अपघातात ऋतुजा दिपक तावरे (वय,१९ ) या तरुणीचा जागीच मृत्यू तर दुचाकीवरील रुपाली अरुण कौले व अंकीता विष्णु तावरे या गंभीर जखमी झाल्या असुन या तरूणी सुपा येथील विद्या प्रतीष्ठानमध्ये शिकत आहेत .

विद्या प्रतीष्ठानच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात ऋतुजा दीपक तावरे , अंकीता विष्णू तावरे , व रुपाली अरुण कौले या शिकत आहेत ( दि .29 ) रोजी महाविद्यालय सुट्टीनंतर या तरूणी दुचाकीवरुन सुप्यावरुन मोरगावला येथे येत असताना सुपा-मोरगाव या रस्त्यावरील राजबाग पाटी नजीक दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली .

या अपघातात ऋतूजा दिपक तावरे या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अंकीता विष्णु तावरे , रुपाली अरुण कौले या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मोरगाव येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

Previous articleहृदयरोग व सर्पदंशतज्ञ डॉ सदानंद राऊत यांना डॉ ज्योती प्रशाद गांगुली राष्ट्रीय पुरस्कार
Next articleअल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध:एकावर गुन्हा दाखल