शॉटसर्किट होऊन घराला लागलेल्या आगीत सर्व जळून खाक

 

 

निरगुडसर : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील मांदळेवाडी येथे शनिवार दि.६ रोजी रात्रीच्या सुमारास शेतकरी फकीरा रंगनाथ मांदळे यांच्या कौलारु घरास शॉर्टसर्किटने आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य, कपडे,भांडी,सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच सर्व घर जळून खाक झाले आहे.
महसुल विभागाने केलेल्या पंचनाम्यात १६ ते १७ तोळे सोने,२ लाख रुपये रोकड,फर्निचर,कपडे इत्यादी वस्तु जळुन खाक झाल्या आहेत.असे एकुण २६ ते २७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सिलेंडरचा स्फोट झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.रविवार दि.७ रोजी सकाळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ पंचनामा करुन आपत्तीग्रस्त कुटूंबियांना नुकसान भरपाई द्यावी.अशी सुचना विवेक वळसे पाटील यांनी महसुल विभागाला केली.त्यांच्या समवेत आंबेगाव तालुका विस्तार अधिकारी रामदास पालेकर,शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय आदक,सरपंच कोंडीभाऊ आदक,प्रा.अरुण गोरडे उपस्थित होते.

Previous articleकुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने १२१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleएस. एम. देशमुख यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला न्याय मिळवून द्यावा