दौंडच्या विद्यार्थ्यांना कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट प्रदान

दिनेश पवार:दौंड:

मार्शल आर्टस बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कुलच्या वतीने शेरू ऍग्रो टुरिझम यवत या ठिकाणी झालेल्या तीन दिवशीय कराटे परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले,यशस्वी विद्यार्थ्यांना आयोजित सन्मान सोहळ्यात ब्लॅक बेल्ट प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, या स्पर्धेत एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या परीक्षेत अभिनव काळे,शुभम वाघ,स्वराज सोनवणे, सुदर्शन फराटे,प्रशिक साळवे,सौरभ वाघ,प्रताप कायगुडे,विजय जाधव,वेदांत चव्हाण, श्रेयश काटे,आर्यन खैरे,चेतन मोटे,तनय काकडे,मृण्मयी भागवत,समृद्धी बनीक,समीक्षा बागल यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.

यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 चे समादेशक श्रीकांत पाठक, नगराध्यक्ष शीतल कटारिया,तालुका क्रीडा अध्यक्ष जालिंदर आवारी,नगरसेवक अरुणा डहाळे,पूजा गायकवाड,शहानवाज पठाण,डॉ.राजेश दाते,सुहास साळवे,मार्गदर्शक राजेंद्र साळवे,परिक्षक कृष्णा अडगळे,सागर भालेराव हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा प्रशिक्षक संतोष सोनवणे यांनी केले होते तर कार्यक्रमासाठी श्रुती कटारिया,प्रशांत खाडे, खुशी कटारिया, प्रेम जाधव,हर्ष पोकार, सागर रकटे, विद्या पोकार,यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले तर आभार हिरालाल साळवे यांनी मानले

Previous articleनववर्षाच्या स्वागतासाठी हाँटेल मराठा सज्ज
Next articleदौंडच्या विद्यार्थ्यांना कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट प्रदान