नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमनपदी आरती वारुळे यांची निवड

Ad 1

व्हॉइस चेअरमन पदी नीलम पाटे कायम

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी आरती संदीप वारुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अशी माहिती सोसायटीचे सचिव गणेश गाडेकर यांनी दिली.
संस्थेच्या गेल्या ८१ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चेअरमन पदी व व्हॉइस चेअरमन पदी महिला विराजमान झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त कर्ज वाटप करणारी ही संस्था असून संस्थेने एकूण २५ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. संस्थेकडे २ कोटी २५ लाख रुपये वसूल भाग भांडवल आहे. अशी माहिती सचिव गाडेकर यांनी दिली.

याप्रसंगी मावळते चेअरमन कैलास डेरे, व्हाँईस चेअरमन नीलम प्रकाश पाटे, सर्व संचालक तसेच नारायणगाव वारूळवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागातील श्री धोंगडे व श्री माळवे यांनी काम पाहिले.