श्री. नागेश्वर पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला : विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुक्यातील पाटस येथील नवजीवन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूक रिंगणातील श्री. नागेश्वर पॅनल प्रतिनिधींच्या प्रचाराचा नारळ शनिवार (ता.२५) रोजी ग्रामदैवत श्री. नागेश्वर मंदिरात फोडण्यात आला.

या कार्यक्रमाला विठ्ठल शिंदे, माणिक भागवत, सुभाष रंधवे, लक्ष्मण पाटील, नितीन शितोळे, अभिजित शितोळे, आण्णा तांबे, राजू शिंदे, शहाजी ढमाले, छगन म्हस्के, हैशिराम शितोळे, आण्णा वायाळ, संपत देवकर, नंदू शितोळे, गणपत तांबे, संपत तांबे, बिरा नरुटे, शांताराम कड व आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पाटस नवजीवन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूकीत सत्वाशील शितोळे, प्रशांत शितोळे, शिवाजी ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नागेश्वर पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. तसेच श्री. नागेश्वर पॅनलकडून सर्वसाधारण प्रतिनिधी राहुल ढमाले, शहाजी गायकवाड, बापू तांबे, भाऊसो शितोळे, आबा नरुटे, नवनाथ वायाळ, अनिल शितोळे, संतोष शिंदे, अनुसूचित जातीचे प्रतिनिधी संजय सोनवणे, महिला प्रतिनिधी सुरेखा शितोळे व सुजाता कसले, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी अजीम तांबोळी, विशेष मागास प्रवर्ग धुळा बरकडे असे एकूण तेरा प्रतिनिधींना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून पॅनलचे सर्व प्रतिनिधी किटली चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत असे पॅनलचे आधारस्तंभ सत्वशील शितोळे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विकास सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. गाव पातळीवरील विविध पिकांचे कर्ज रोखे, पाईपलाईन व मोटर साठी या सोसायटया मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. या विकास सोसायट्या त्याच्या परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची जोडलेल्या असतात. माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शना खाली अनेक विकास सोसायट्यांचा विकासाचा आलेख चढता आहे. अनेक सोसायट्यांच्या बँकेत मुदत ठेवी आहेत. अनेक विकास सोसायट्यांचा वसुल हा शंभर टक्के असल्याने सभासदांना वर्षाकाठी लाभांश देतात. त्यामुळे विकास सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साधन आहे. यामुळे विविध कार्यकारी सोसायटींची निवडणूक अटीतची होताना दिसत आहे.

पाटस नवजीवन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूकीचे निर्णय अधिकारी म्हणून पी. शितोळे हे कामकाज पाहणार असून २ जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे.

पाटस नवजीवन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूकीत एकूण ६७३ मतदार असून श्री. नागेश्वर पॅनलचे सर्व प्रतिनिधी चांगल्या मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleकविता शेडगे यांचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने गौरव
Next articleपाटस जवळ यवत पोलिसांनी पकडला ३० लाखाचा गांजा