कविता शेडगे यांचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने गौरव

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ओबीसीचे व्यथा आणि हक्क मांडण्यासाठी ओबीसी हे हक्काचे व्यासपीठ उभारण्यात आले याच माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्लभ घटकांसाठी झटणाऱ्या कविता शेडगे यांचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी ओबीसी चळवळीचे प्रणेते संजय कोकरे यांच्या नेतृत्वाखाली व सुप्रिया कोकरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ३० महिलांना नारीशक्ती व युवा पुरस्कार देण्यात आला.

पुणे जिल्ह्यातून थेऊरच्या कविता शेडगे यांचा मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पैठणी व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शेडगे यांची या पुरस्कारासाठी ओबीसी महाराष्ट्र संघटक सुनिल थोरात यांनी शिफारस केली होती.

यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशन हवेलीचे कोषाध्यक्ष गणेश तिखे, संजना शेडगे, कृष्णा शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleबातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8600803587
Next articleश्री. नागेश्वर पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला : विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल