हिंगणीबेर्डी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत रेश्मा गायकवाड विजयी

दिनेश पवार:दौंड

हिंगणीबेर्डी ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 2 मधील पोटनिवडणुकीत रेश्मा परमेश्वर गायकवाड यांनी 148 मतांनी विजय मिळवला आहे.या पोटनिवडणुकीत रिक्त झालेल्या एका जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली एका जागेसाठी तीन उमेदवारांनी निवडणूक लढवली यामध्ये रेश्मा गायकवाड यांना 398 मते मिळाली,अनिता नामगुडे यांना 250 मते मिळाली, सुरेखा काळे यांना 232 मते मिळाली सदर निवडणुकीत रेश्मा परमेश्वर गायकवाड यांनी 148 मतांनी विजय मिळवल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश गायकवाड यांनी जाहीर केले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8600803587

गावच्या सर्वांगीण दृष्टीने विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे रेश्मा गायकवाड यांनी सांगितले,परमेश्वर गायकवाड यांनी गावातील सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामाची दखल नागरिकांनी घेतल्याने भरघोस मतांनी रेश्मा गायकवाड यांचा विजय झाल्याचे दिसून येते सदर विजयामुळे गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या

Previous articleओबीसी चळवळीच्या वतीने ३० महिलांचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव
Next articleबातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8600803587