ओबीसी चळवळीच्या वतीने ३० महिलांचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ओबीसीचे व्यथा आणि हक्क मांडण्यासाठी ओबीसी हे हक्काचे व्यासपीठ उभारण्यात आले याच माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्लभ घटकांसाठी झटणाऱ्या जवळपास ३० महिलांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ओबीसी चळवळीचे प्रणेते संजय कोकरे यांच्या नेतृत्वाखाली व सुप्रिया कोकरे यांच्या स्मरणार्थ नारीशक्ती व युवा पुरस्कार देण्यात आला.

मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हातून थेऊरच्या कविता शेडगे यांचा मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पैठणी व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यांची या सन्मासाठी ओबीसी महाराष्ट्र संघटक सुनिल थोरात यांनी शिफारस केले होती. यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशन हवेलीचे कोषाध्यक्ष गणेश तिखे, संजना शेडगे, कृष्णा शेडगे उपस्थित होते.

Previous articleतरूणांनी स्वातंत्रलढ्यातुन प्रेरणा घेऊन पाणी बचतीची लोकचळवळ उभी करायला हवी – प्रविण मोरे
Next articleहिंगणीबेर्डी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत रेश्मा गायकवाड विजयी