तरूणांनी स्वातंत्रलढ्यातुन प्रेरणा घेऊन पाणी बचतीची लोकचळवळ उभी करायला हवी – प्रविण मोरे

अमोल भोसले,उरुळी कांचन

नेहरू युवा केंद्र पुणे, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार ,ए एस दिवेकर महाविद्यालयात महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरवंड (ता-दौंड) येथे जल जागरण अभियान प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला ए एस दिवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितोळे, उपप्राचार्य डॉ.अनिल शिरोळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.विनोद काकडे व डॉ. माने मॅडम , तसेच नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रियांका बोगाळे आणि माजी राष्टीय युवा स्वयंसेवक प्रविण मोरे उपस्थित होते.

प्रा.विनोद काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून देताना जल जागरण अभियानचे महत्व सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित महाविद्यालयीन तरुण-तरुणींना प्रविण मोरे यांनी जलसाक्षरता विषयावर मार्गदर्शन केले.” तिसरे महायुद्ध हे पाणीप्रश्वारून होणार असल्याचे भाकीत अभ्यासकांनी मांडले आहे. त्यामुळे पुढील धोका ओळखून आजच्या युवांनी पाण्याची बचत करायला हवी. त्यासाठी जलसाक्षरता अंगी बनवणे खूप महत्वाचे आहे. पाणीप्रश्नाबाबत सीरिया या राष्ट्राला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. आज सीरियामध्ये जे अराजक माजले आहे त्याची मुळे कुठेतरी पाणी टंचाईमध्ये सापडतात. म्हणून स्वातंत्रलढ्यातुनच प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांनी पाणी बचतीची लोकचळवळ उभी करायला हवी ,असे मत प्रविण मोरे यांनी व्यक्त केले.’कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दुर्गाडे सर यांनी केले तर आभार डॉ. माने मॅडम यांनी मानले.

Previous articleपोलीस भरती प्रक्रियेत डमी परीक्षार्थीला दौंड पोलिसांनी केली अटक
Next articleओबीसी चळवळीच्या वतीने ३० महिलांचा राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव