पोलीस भरती प्रक्रियेत डमी परीक्षार्थीला दौंड पोलिसांनी केली अटक

दिनेश पवार – दौड

दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7(सात) येथे कुसडगाव येथील गट क्रमांक 19 ची पोलीस शिपाई पदाची शारीरिक मैदानी चाचणी सुरू असताना या चाचणीमध्ये एका डमी उमेदवारास आणि परीक्षार्थीला दौंड पोलिसांनी अटक केली, प्रकाश बाळू त्रिभुवन (वय 27 रा.नालेगाव ता.वैजापूर जि. औरंगाबाद) या मूळ परीक्षार्थी च्या जागी गजानन किसन ठाकूर हा डमी उमेदवार शारीरिक चाचणी साठी आला,असता त्याचा फोटो व सही वेगळी दिसून आल्याने सदर प्रकार उघडकीस आला.

याबाबत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 चे पोलीस निरीक्षक महेंद्र दत्तात्रय कोरे यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून दोन्ही आरोपींना दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली

Previous articleसुनेत्रा पवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
Next articleतरूणांनी स्वातंत्रलढ्यातुन प्रेरणा घेऊन पाणी बचतीची लोकचळवळ उभी करायला हवी – प्रविण मोरे