आळंदी म्हातोबाची येथे आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

मौजे आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा पुणे व कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे ज्ञानेश्वर बोटे, प्रकल्प संचालक आत्मा पुणे राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषि अधिकारी पुणे सुनिल खैरनार व प्रकल्प उपसंचालक आत्मा पुनम खटावकर, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कृषि अधिकारी, हवेली मंडळ कृषि अधिकारी हडपसर व कृषि विज्ञान केंद्र,बारामती यांच्या वतीने कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.

सदर प्रशिक्षण वर्ग डाॅ.विवेक भोईटे, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी शेती मधील सुक्ष्मसिंचनाचा वापर व फायदे, पाण्याचा नियंत्रित वापर , पाण्याचे आरोग्य, सुक्ष्म सिंचनाच्या पद्धती, पिकांच्या उत्पादना मधील पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व, सुक्ष्म सिंचन संचाची देखभाल, कांदा बिजोत्पादन कार्यक्रम, कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन चे कांदा बिजोत्पादन मधील महत्त्व, कांदा पिकाचे एकरी २५टन उत्पादन तंत्रज्ञान , जमीनीची पुर्व मशागत, सेंद्रिय खते, जिवाणू संवर्धक खते व माती परिक्षण अहवालानुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर, योग्य वाणांची निवड, कांदा रोपवाटिका व्यवस्थापन, कांदा लागवड पद्धती ,पाणी व्यवस्थापन मध्ये सुक्ष्म सिंचन चा वापर,किड रोग नियंत्रण व उपाययोजना, कांदा काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान, कांदा चाळ उभारणी व कांदा चाळीमध्ये साठवणूक करताना घ्यावयाची काळजी व विक्री व्यवस्था बाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन करताना कांदा चाळ उभारणी बाबत सविस्तर माहिती देऊन शासकीय अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कृषि यांत्रीकीकरण योजना अंतर्गत विविध कृषि औजारे, संरक्षित शेती अंतर्गत शेडनेट, पाॅलीहाऊस उभारणी, रोपवाटिका व्यवस्थापन, गांडुळ खत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्पचा अवलंब करुन सेंद्रिय खतांचे उत्पादन शेतावरच करुन रासायनिक खतांवरील होणारा खर्च कमी करणे, कांद्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी युरिया खताचा नियंत्रित वापर करुन जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा अवलंब केल्यास कांदा चाळीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.

मंडळ कृषि अधिकारी हडपसर गुलाब कडलग यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, गांडुळ खत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्प बाबत सविस्तर मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी बांधावरील फळबाग लागवड व सलग लागवड करुन शासकीय अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन करून गांडूळ खत प्रकल्प व नाडेप खत प्रकल्प च्या माध्यमातून सेंद्रिय खतांचे उत्पादन करावे, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना मधुन कृषि उत्पादनावर प्रक्रिया करुन शेत मालाचे मुल्यवर्धन करणे व विक्री व्यवस्था बाबत माहिती दिली तसेच ऊस पाचट व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करून ऊसाचे पाचट न जाळता जागेवर पाचट कुजविण्याची प्रक्रिया करुन जमीनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

कृषि पर्यवेक्षक हडपसर-२ रामदास डावकर यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन बाबत मार्गदर्शन करताना सदर योजनेचे निकष, नियम व अटी, महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याची पद्धत, कागदपत्रांची पूर्तता, लाॅटरी द्वारे लाभार्थी निवड, पुर्वसंमती,मोका तपासणी, अनुदान रक्कम, डीबीटी च्या माध्यमातून अनुदान वितरण प्रणाली बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ मेघराज वाळुंजकर यांनी जमीन सुपिकता, जमीनीचे आरोग्य, माती, सेंद्रिय कर्ब, हवा, पाणी व जिवाणूं चे पिक उत्पादन मधील महत्त्व विशद करताना सेंद्रिय खतांचा वापर, जिवाणू संवर्धक खतांचा वापर, माती परिक्षण अहवालानुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर, हिरवळीचे खत, पिकांची फेरपालट, आंतरपिके, मिश्रपिके, सापळा पिके, फेरोमेन सापळे, चिकट सापळे, उपयुक्त जिवाणू व बुरशींचा किडरोग नियंत्रण मध्ये अवलंब करणे, एकात्मिक शेती विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पिक उत्पादन बरोबरच शेती पुरक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम उद्योग, कृषि प्रक्रिया उद्योग ची जोड देऊन शाश्वत उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकरी गटांच्या माध्यमातून सेंद्रिय व विषमुक्त भाजीपाला, अन्नधान्य,फळे व प्रक्रिया युक्त सेंद्रिय उत्पादने महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या मार्फत विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्राच्या माध्यमातून शेतमालाची विक्री करावी व जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवण्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी माहिती त्यांनी दिली.

श्रीमती रेश्मा शिंदे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा व सिद्धेश्वर अवचर, कृषि सेवक आळंदी म्हातोबाची यांनी प्रशिक्षण वर्गासाठी विशेष परिश्रम घेतले. मेघराज वाळुंजकर कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. श्रीमती मुक्ता गर्जे कृषि सहाय्यक लोणीकाळभोर यांनी शेतीची प्रतिज्ञा घेऊन सदर प्रशिक्षण वर्गास सुरूवात केली.

यावेळी कृषि सहाय्यक श्रीमती ज्योती हिरवे, श्रीमती पुष्पा जाधव, शंकर चव्हाण, महेश महाडीक तसेच ओंकार ढोबळे सर, केव्हीके बारामती व ग्रामसेवक पवार भाऊसाहेब हे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण वर्गास सोनाली जवळकर, सरपंच श्रीहरी काळभोर, उपसरपंच दयानंद शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य, बाळासाहेब शिवरकर, तंटामुक्ती उपाध्यक्ष दत्तात्रय जवळकर, कृषिमित्र विजय जवळकर, सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी कैलास भोंडवे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानेश्वर जवळकर, सेवावृत्त पोलीस उपअधीक्षक व नैसर्गिक शेती उत्पादक शेतकरी यांनी नैसर्गिक शेती चे महत्त्व विशद करताना सर्व शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून विषमुक्त भाजीपाला, फळे व अन्नधान्य पिकांचे उत्पादन घेऊन शेतीवरील उत्पादन खर्च कमी करणे बाबत मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

तसेच शेतकरी प्रशिक्षण वर्गानंतर क्षेत्रीय भेटीचे वेळी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, गांडुळ खत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्प,आंबा मोहोर संरक्षण, अंजीर,कांदा, हरभरा, भाजीपाला उत्पादन,किड रोग नियंत्रण व उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Previous articleपैलवान नागेश कराळे यांची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चाकण पोलिसांच्या जाळ्यात
Next articleसुनेत्रा पवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान