पैलवान नागेश कराळे यांची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चाकण पोलिसांच्या जाळ्यात

 

चाकण- खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे पैलवान नागेश सुभाष कराळे यांच्यावर पाच जणांनी पाच ते सहा गोळ्या झाडून हत्या केली.या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

शिवकांत शिवराम गायकवाड (वय ४३, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.२३) रोजी रात्री नऊच्या सुमारास नागेश कराळे शेलपिंपळगाव येथील एका बिअरशॉपी जवळ आपल्या जीपमध्ये बसत असताना कार मधून आलेल्या आरोपींनी कराळे यांच्यावर पिस्तूलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यात कराळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी गिरीश बाळासाहेब कराळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुढिल तपास चाकण पोलीस करत आहेत.

Previous articleखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी बारकू जाचक
Next articleआळंदी म्हातोबाची येथे आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न