Breaking news- शेलपिंपळगाव येथे ३८ वर्षाच्या युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या

चाकण- खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे ३८ वर्षाच्या युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज रात्री ९.०३ वाजण्याच्या सुमारास घडली. नागेश सुभाष कराळे (वय ३८, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेलपिपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ आज रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास फोर्ड फिगो या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी नागेश वर चार राउंड फायर केल्याचे समजते. त्यास चाकण येथील जयहिद हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे घोषित केले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous articleतळेगाव मध्ये सतरा वर्षीय युवकाची डोक्यात हातोडा घालून हत्या : इंस्ट्राग्राम स्टेटस बेतले जिवावर
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न