अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत वांंढेकर , युवक जिल्हाध्यक्षपदी मयूर सोळसकर, शेतकरी मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल कुंजीर यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष रणजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या असून मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप जगताप यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आली. यावेळी पुरंदर येथील पुणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्ष पदी प्रशांत वांढेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

निवडी नंतर बोलताना आगामी काळात आम्हाला दिलेल्या जबाबदारी प्रमाणे काम करू आणि रणजीत जगताप यांनी दर्शविलेला विश्वास सार्थ करून दाखवू तसेच समाजामध्ये मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष -आप्पासाहेब पवार यांच्या विचाराने एक दिलाने काम करण्याचा विश्वास यावेळी प्रशांत वाढेकर यांनी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यक्त केला.

तर यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी कासूर्डी (ता दौंड) येथील मयूर सोळसकर, पुणे शेतकरी मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष पदी डाळींब (ता.दौंड) येथील विशाल कुंजीर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील ,महामुंबई विभागीय अध्यक्ष – प्रशांत सावंत, युवकचे प्रदेश संघटक करणसिंह रणवीर, युवकचे पश्चिम महाराष्ट्र संघटक / सचिव गोरख कामठे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदयसिंह पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला.

Previous articleउद्योजक शुभम पवळे यांनी शेलपिंपळगाव येथील अनाथाश्रमात जाऊन केला वाढदिवस साजरा
Next articleबंद यशवंत सहकारी साखर कारखान्यातून चोरीचा प्रयत्न