उद्योजक शुभम पवळे यांनी शेलपिंपळगाव येथील अनाथाश्रमात जाऊन केला वाढदिवस साजरा

चाकण – काळूस येथील उद्योजक शुभम पवळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेलपिंपळगाव येथिल संपर्क बालग्राम ठिकाणी अनाथ मुलांमध्ये जाऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी गणेश पवळे सरपंच काळुस, संचालक आण्णासाहेब मगर बँक,गजानन पवळे सचिव वि.का.सोसायटी,मंगेश टेमगिरे , महेश जाचक, आकाश पवळे, राजेंद्र पवळे,सनी पवळे,प्रतीक दौंडकर उपस्थित होते.

प्रत्येकाने अनाथाश्रमात जाऊन आपला वाढदिवस साजरा करावा अशी भावना शुभम पवळे यांनी व्यक्त केली

Previous articleवाकळवाडी सोसायटीवर सहकार पॅनेलचा एकहाती विजयी ! १० x ० ने मिळवला दणदणीत विजय !
Next articleअखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रशांत वांंढेकर , युवक जिल्हाध्यक्षपदी मयूर सोळसकर, शेतकरी मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल कुंजीर यांची निवड