वाकळवाडी सोसायटीवर सहकार पॅनेलचा एकहाती विजयी ! १० x ० ने मिळवला दणदणीत विजय !

राजगुरुनगर- वाकळवाडी (ता.खेड) विविध विकास सेवा सहकारी सोसायटीवर वाळकेश्वर सहकार पॅनेलने वाळकेश्वर परिवर्तन पॅनेलचा १०x० फरकाने एकहाती विजय मिळवला.

कचरुशेठ पवळे यांच्या नेतृत्वाखालील वाळकेश्वर सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ~ सर्वसाधारण खातेदार कर्जदार सभासद प्रतिनिधी:
कचरुशेठ पांडू पवळे (१६०) , महादू भिवा पवळे (१५६), दत्तात्रय भिवा पवळे (१५४), सतिश बाजीराव पवळे (१५४), जयराम गौबा कोरडे (१५३), सुदाम इंदाराम शेवाळे (१४७), शंकर बंडू पवळे (१४६), गणपत सखाराम पवळे (१४४)

महिला प्रतिनिधी:
कुसूम कोंडिभाऊ कोरडे (१६०),फुलाबाई आनंदराव पवळे (१४६),दिलीप महादेव सुके आणि पोपट देवराम साबळे यांची बिनविरोध निवड झाली.

भावकीची एकजूट, जनशक्ती आणि युवकांचे संघटन यामुळे सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला असल्याच्या भावना पॅनेलप्रमुख कचरुशेठ पवळे, धर्मराज पवळे, योगेश पवळे, दशरथशेठ पवळे, दिलीप सुके, अतुल पवळे, बबनराव पवळे, आनंदराव नायकवाडी, रमेश पवळे, नरेंद्र वाळुंज, संभाजी कोरडे, राहुल कोरडे, मच्छिंद्रभाऊ पवळे, पांडुरंग पवळे, अमोल पवळे, शाम पवळे, खंडू बाळा पवळे, श्रीधरशेठ कोरडे, विजूशेठ कोरडे, एकनाथआप्पा पवळे, रामचंद्र पवळे, हनुमंत पवळे, सुरेशकाका पवळे, गोपाळबाबा पवळे, पी.डी.पवळे, गोविंद शेवाळे, गणपतदादा चौधरी, कांताराम पडवळ, राजेश गुरव, सर्व युवाशक्ती आणि सहकार पॅनेलच्या सूज्ञ मतदारांनी व्यक्त केल्या. जे.बी.मुलाणी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

आमदार दिलीपराव मोहिते पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

वाकळवाडी सोसायटीच्या प्रगतीपथावरील पारदर्शक कारभाराचा हा विजय असल्याचे मत आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

Previous articleशेलपिंपळगाव येथे कडूलिंबाच्या झाडाच्या फांदीला तरुण-तरुणीने घेतला गळफास : तरूणीचा मृत्यू
Next articleउद्योजक शुभम पवळे यांनी शेलपिंपळगाव येथील अनाथाश्रमात जाऊन केला वाढदिवस साजरा