शैलपिंपळगाव येथे कडूलिंबाच्या झाडाच्या फांदीला तरुण-तरुणीने घेतला गळफास : तरूणीचा मृत्यू

शैलपिंपळगाव येथे
कडूलिंबाच्या झाडाच्या फांदीला तरुण-तरुणीने घेतला गळफास : तरूणीचा मृत्यू्

चाकण- खेड तालुक्यातील शैलपिंपळगाव जवळील मोहितवाडी येथे बांधावरील कडूलिंबाच्या झाडाच्या फांदीला जुन्नर तालुक्यातील तरुण- तरुणीने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली.ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

सुषमा दिनकर सोनवणे (वय २२, रा. जांभूळसी, पो. मांडवे, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर हरिदास कुंडलिक देवचे (वय २८, रा. जांभूळसी, पो. मांडवे, ता. जुन्नर) असे प्रकृती चिंताजनक असलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सुषमा व हरिदास हे दोघे एकाच गावचे राहणारे आहेत. शेलपिंपळगाव जवळील मोहीतेवाडी गावच्य झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दुर्दैवाने या घटनेत सुषमा हिचा जागीच मृत्यू झाला, तर हरिदास हा बेशुद्ध पडला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

Previous articleनारायणगावात ‘ओमायक्रॉन’ चा आणखी एक रूग्ण : रुग्णांची संख्या झाली आठ
Next articleशैलपिंपळगाव येथे कडूलिंबाच्या झाडाच्या फांदीला तरुण- तरुणीने घेतला गळफास : तरूणीचा मृत्यू