सुनिल तांबे युवा मंच आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे राजेंद्र टिळेकर यांचे हस्ते उद्घाटन

अमोल भोसले,उरुळी कांचन

शारिरीक आरोग्यासाठी अशा खेळाची गरज असुन योग्य स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकचे विशेष कौतुक केले. खेळा बरोबर ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे यांनी वॅार्ड क्र.३ चा विकास झपाट्याने करत आहे हि अभिमानाची बाब आहे असे मत महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर यांनी व्यक्त करुन खेळाडुना शुभेच्छा दिल्या. तसेच उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी देखील या स्पर्धेसाठी ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

शिंदवणेचे माजी सरपंच आण्णा महाडिक, ओबीसी हवेली ता.अध्यक्ष सुभाष टिळेकर, युवा नेते अजिंक्य कांचन, शिवाजी ननावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेना नेते राजेंद्र बोरकर, ग्रा.पं.सदस्य राजेंद्र कांचन, सदस्य- भाऊसाहेब कांचन, सदस्य-अमित कांचन, अध्यक्ष-संतोष टिळेकर, पो.पाटील विजय टिळेकर,
शरद तांबे,अमोल टिळेकर, धनंजय टिळेकर, राहुल टिळेकर, जीवन टिळेकर, तेजस टिळेकर, आकाश लोणकर, सागर पांगारे, लक्ष्मण वाईकर, शशराव कांबळे, अनिल शेलार, संतोष तांबे, नितिन खैरे, शेखर गोरे, योगेश कांचन पाटील, देविदास ताम्हाणे, समाधान तुपेरे, तानाजी मोहिते, संदिप शेलार, प्रसाद कांचन, चित्रभुज शेलार, संदिप तांबे, दादा तांबे, सुहास बांरुगुळे, दिलीप शेलार, दत्ता शेलार, बंटी कुंजीर, युनुस शेख, बबु पठाण, दिपक धाऊत्रे, तुकाराम गायकवाड, तसेच इतर मान्यवर, क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हि स्पर्धा कोरोनाचे सर्व नियम पाळुन होणार असुन परिसरातील नागरिकांना देखील त्रास होणार नाही सर्व खेळ हा शांततेत होईल हि स्पर्धा पाच दिवस चालणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक ग्रा.पं.सदस्य सुनिल तांबे यांनी सांगितले.

Previous articleनारायणगावात ‘ओमायक्रॉन’ चे आढळले ७ रूग्ण;दुबईला गेले होते पर्यटनासाठी- डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली माहिती
Next articleदारू पिण्यासाठी वीस रुपये न दिल्याने मित्राचा खून ;खेड पोलीसांनी आठ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या