नारायणगावात ‘ओमायक्रॉन’ चे आढळले ७ रूग्ण;दुबईला गेले होते पर्यटनासाठी- डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली माहिती

किरण वाजगे

नारायणगाव (ता.जुन्नर) येथील पर्यटनासाठी यूएई, दुबई येथे गेलेल्या १६ जणांपैकी ७ व्यक्तींचे आर.टी.पी.सी. आर अहवाल OMICRON ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

नुकतेच दुबई वरून आल्यानंतर त्यांचे तात्काळ आर टी पी आर – (rtpcr) नमुने घेण्यात आले. हे नमुने (दि. १२) डिसेंबर रोजी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी एकूण ७ व्यक्तींचे नमुने आज (दि १७) रोजी OMICRON पॉझिटिव्ह आले आहेत.

सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आले आहेत. व ते पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. या रुग्णामध्ये सौम्य लक्षणे असून या रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दरम्यान सातपैकी चार जण नारायणगावचे असून तीन जण शेजारीच असलेल्या वारूळवाडी गावचे रहिवासी आहेत. हा व्हायरस तात्काळ पसरत असून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. मात्र या सर्व रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून घाबरून जाण्याची गरज नाही अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleविद्यार्थ्यांना पोस्ट स्टडी वर्क व्हिजासाठी राज्यशासन देणार ना हरकत प्रमाणपत्र ; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
Next articleसुनिल तांबे युवा मंच आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे राजेंद्र टिळेकर यांचे हस्ते उद्घाटन