उरुळी कांचन येथे भाजपच्या वतीने कृषी परिषद व्हर्च्युअल लाईव्हचे आयोजन

अमोल भोसले,उरुळी कांचन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या झिरो बजेटचे सूत्र अवलंबणे हाच खरा हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रबोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केले. उरुळी कांचन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राकृतिक कृषी परिषद व्हर्च्युअल लाईव्हचे शहर कार्यकारणी भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी हवेली भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, क्षेत्रीय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, पं.स.सदस्य शामराव गावडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, प्रविण काळभोर, सुदर्शन चौधरी , विकास जगताप, धर्मेंद्र खांडरे, श्रीकांत कांचन, विजय जाचक, गणेश चौधरी, पुनम चौधरी, सारीका लोणारी, अमित कांचन, निलेश कानकाटे, आबासाहेब चव्हाण, भाऊसाहेब कांचन, ऋषीकेश शेळके, जयेश जाधव, सुनिल तुपे, गुरुनाथ मचाले, अभिजित महाडिक सह हवेली तालुक्यातील विविध आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र व्यापारी विभागाचे अध्यक्ष विकास जगताप, जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, शहराध्यक्ष अमित कांचन यांनी केले होते.

Previous articleभाजपाच्या हवेली तालुकाध्यपदी भाऊसाहेब कांचन,जयेश जाधव, अभिजित महाडिक
Next articleविद्यार्थ्यांना पोस्ट स्टडी वर्क व्हिजासाठी राज्यशासन देणार ना हरकत प्रमाणपत्र ; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण