भाजपाच्या हवेली तालुकाध्यपदी भाऊसाहेब कांचन,जयेश जाधव, अभिजित महाडिक

अमोल भोसले ,पुणे

भाऊसाहेब पांडुरंग कांचन यांची “भाजपा किसान मोर्चा हवेली तालुका अध्यक्ष” पदी तसेच अभिजीत रमेश महाडिक यांची “भाजपा आर्थिक आघाडी अध्यक्ष हवेली तालुका” पदी व जयेश संजय जाधव “भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष हवेली तालुका” पदी निवड करण्यात आली. सदरची निवड भारतीय जनता पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष पै संदीप भोंडवे यांनी केली.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे पश्चिम अध्यक्ष विकास जगताप, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, प्रविण काळभोर, सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, धर्मेंद्र खांडरे, क्षेत्रीय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, जिल्हा महिला संघटक पुनम चौधरी, शहर अध्यक्ष अमित कांचन, विद्यार्थी अध्यक्ष ऋषीकेश शेळके, झोपडपट्टी तालुका अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, ओबीसी प्रदेश सरचिटणीस सारिका लोणारी, सुनिल तुपे, निलेश कानकाटे, गणेश चौधरी, विजय जाचक, गुरुनाथ मचाले, ओंकार कांचन, सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleभाजपाच्या हवेली तालुकाध्यपदी भाऊसाहेब कांचन,जयेश जाधव, अभिजित महाडिक
Next articleउरुळी कांचन येथे भाजपच्या वतीने कृषी परिषद व्हर्च्युअल लाईव्हचे आयोजन