बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा सुवर्ण महोत्सवी विजय दिवस दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शहिद वीरांना अभिवादन

अमोल भोसले,पुणे

बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवी विजय दिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन केले आहे. या युद्धातील शहिद वीर जवानांच्या स्मृतींनाही त्यांनी अभिवादन केले आहे.संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बांगलादेश मुक्ती संग्रामाचा आज सुवर्ण महोत्सवी विजय दिवस. या युद्धातून भारतीय सैन्याने जगासमोर मानवी मुल्यांच्या रक्षणासाठी शौर्य आणि धैर्याचे उत्तम उदाहरण ठेवले. आपल्या शूरवीरांनी प्राणांची बाजी लावली, यात महाराष्ट्र सुपुत्रांनीही पराक्रमाची शर्थ केली. या युद्धातील शहिद वीर जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. या सर्वांच्या त्याग, समर्पणाला शतशः वंदन तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्ततेलाही नमन.

तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींचं साहसी नेतृत्वं आणि सैनिकांच्या अभूतपूर्व शौर्यामुळेच बांगलादेश मुक्ती शक्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

“बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या 1971 च्या ऐतिहासिक युद्धात भारताने, 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आज सुवर्णमहोत्सव. भारतीय सैन्यासमोर त्यादिवशी नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते.

भारतीय सैन्यासाठी, तमाम देशवासियांसाठी तो गौरवक्षण अनुभवण्याचे भाग्य प्राप्त करुन देणाऱ्या देशाच्या वीर सैनिकांना, त्यांच्या शौर्याला, त्यागाला कृतज्ञतापूर्वक वंदन. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या साहसी, कुशल, दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच तो ऐतिहासिक विजय शक्य झाला. त्याबद्दल त्यांचंही कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन. देशाच्या वीर सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश कायम भक्कमपणे उभा राहील, हा विश्वास आहे. समस्त देशवासियांना बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजयदिनाच्या शुभेच्छा.

Previous articleशर्यतीला परवानगी मिळाल्याने सावरदरीत जल्लोष
Next articleभाजपाच्या हवेली तालुकाध्यपदी भाऊसाहेब कांचन,जयेश जाधव, अभिजित महाडिक