शर्यतीला परवानगी मिळाल्याने सावरदरीत जल्लोष

चाकण- सुप्रिम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्थ परवानगी दिली. या निर्णयाचा सावरदरी गावातील ग्रामस्थ व बैलगाडा मालक यांना आनंद झाला.

सावरदरी गावांची परंपरा आहे गावच्या ग्रामदैवत किंवा कुलदैवताची यात्रा असली की गावकरी, शेतकरी आपला बैलगाडा त्या यात्रेत देवाच्या नावाने पळवत होता..पुढे यालाच शर्यतीचे स्वरूप आले.
गाव गावच्या ग्रामदैवत, कुलदैवत यांच्या यात्रा तर भरायच्या पण बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे त्या यात्रेस गर्दी होत नसे माणसांची गडबज यात्रेत नसे पण आता तसे होणार नाही बैलगाडा शर्यत चालू झाली पुन्हा एकदा गावो गावच्या यात्रेला गर्दी होईल यात्रा माणसांने गजबजतील !

सावरदरी गावात बैलगाडा मालक व ग्रामस्थ यांनी भव्य मिरवणूक व फटाके वाजवून दिवाळी साजरी. यामध्ये सरपंच भरतशेठ तरस, उपसरपंच संदिप पवार पोलिस पाटील राहुल साकोरे ,श्री संतोष शिंदे सर ,श्री मच्छिंद्र शेटे ,सर गाडामालक श्री बाळासाहेब धोंडीबा पवार, गाडामालक श्री सुरेश तात्या पवार ,श्री शिवाजी बोत्रे ,उत्तम शेटे ,राजाराम शेटे ,गणपत साकोरे ,श्रीहरी सोनवणे ,निवृत्ती पवार, महादु बोत्रे, आप्पा शेटे, करणदादा शेटे, युवराज बोत्रे, बाळासाहेब साकोरे, भगवंत शिंदे, व्यापारी श्री बाबुराव शेटे, भिमराव शेटे, निखिल पवार, संतोष पवार, नितीन पवार ,अतुल बोत्रे,मिथुन शिंदे,अविनाश येळवंडे व सावरदरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleवर्ष उलटलं..बारा आमदारांची नियुक्ती नाही, हे लोकशाहीत बसतं का ?
Next articleबांगलादेश मुक्तीसंग्रामाचा सुवर्ण महोत्सवी विजय दिवस दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शहिद वीरांना अभिवादन