राजगुरूनगर मध्ये भरदिवसा पिकअपमधून तीन लाखांची रोकड लंपास

राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गावर उभ्या केलेल्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून पावणेतीन लाखांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.ही घटना राजगुरुनगर येथे घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी सावंत यांच्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून २ लाख ८६ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करतात. गाडीमध्ये किराणा माल भरून डेहणे, वाडा, खेड येथील दुकानदारांना देण्यासाठी आले होते. दुकानदारांकडून गोळा केलेले पैसे त्यांनी गाडीच्या डिकीत ठेवले होते.

मंगळवारी (दि. 1४) दुपारी तीनच्या सुरमास राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पुणे-नाशिक महामार्गालगत पिकअप गाडी उभी करुन धनश्री चौकातील एका हॉटेलमध्ये बाथरुमसाठी गेले होते. चोरट्यांनी १० मिनिटात गाडीच्या दरवाजाचे लॉक तोडून डिकीत ठेवलेले २ लाख ८६ हजारांची रोकड लंपास केली.याप्रकरणी पिकअप चालक अर्जुन लक्ष्मण सावंत (रा. भोमाळे ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Previous articleदौंडच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश
Next articleबैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या निर्णयाने पहिल्या टप्प्यातील लढाई महाविकास आघाडी सरकारने जिंकली-खा.डॉ.अमोल कोल्हे