दौंडच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश

दिनेश पवार:दौंड

दौंड मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कुल यांच्या वतीने संत तुकडोजी माध्यमिक विद्यालय दौंड येथे आयोजित केलेल्या कलर बेस्ट परीक्षेत तालुक्यातील उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

या परीक्षेत एकूण 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना तुकडोजी विद्यालयाचे सचिव डावरे सर,दौंड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष जालिंदर आवारी, सेन्सइ राजेंद्र साळवे यांच्या हस्ते बेस्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, सदर परीक्षेसाठी शिक्षक राष्ट्रीय कराटे पंच कृष्णा अडागळे,योगेश बोराडे,यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या परीक्षेचे आयोजन संतोष सोनवणे यांनी केले होते.

हिरालाल साळवे,गणेश फुंडे,श्रुती कटारिया,शुभम वाघ,खुशी कटारिया, हर्ष पोकार, सागर रकटे,विद्या पोकार यांचे विशेष सहकार्य लाभले

Previous articleगरजू घटकांना उद्योग व अर्थसहाय्याद्वारे सक्षम बनवावे – धनंजय मुंडे
Next articleराजगुरूनगर मध्ये भरदिवसा पिकअपमधून तीन लाखांची रोकड लंपास