विश्वराज हाॅस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली तालुका पत्रकार संघाच्या सभासदांची व कुटुंबातील सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

पत्रकारीता क्षेत्रही वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच धावपळीचे असल्यामुळे पत्रकारांनी प्रत्येक वर्षी सहकुटुंब आरोग्य तपासणी करावी असे आवाहन विश्वराज हाॅस्पिटलच्या कार्यकारी संचालक डाॅ. आदिती कराड यांनी केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिना निमित्त हवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी आज विश्वराज हाॅस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर येथे करण्यात आली. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करताना डाॅ. आदिती कराड बोलत होत्या. यावेळी विश्वराज हाॅस्पिटलचे व्यवस्थापक डाॅ. पी के देशमुख, जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, जेष्ठ पत्रकार प्रभाकर क्षीरसागर, तुळशीराम घुसाळकर, सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष गणेश सातव, हवेली तालुका पत्रकार संघ सचिव अमोल आढागळे, सुधीर कांबळे, हनुमंत चिकणे व सोशल मिडीया परिषदेचे पत्रकार सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना डाॅ. आदिती कराड पुढे म्हणाल्या करोनाच्या दोन्ही लाटेमध्ये पत्रकार व डाॅक्टर या दोघांचीही खुपच धावपळ झाली आहे. करोना पश्चात सर्वांनी आपापल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. महिला आपल्या आरोग्याबाबत निष्काळजीपणे वागतात. त्यामुळे महिलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे असे मत डॉ आदिती कराड यांनी मांडले. यावेळी डाॅ. पी के देशमुख यांनी ही विचार व्यक्त केले.

हवेली तालुका पत्रकार संघ व विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात पत्रकार व कुटुंबातील ५३ जणांची तपासणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता या शिबीराला पत्रकार व डॉक्टरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती. दुपारी ३ वाजता डॉ. पी के देशमुख यांच्या मार्गदर्शनपर भाषणानंतर शिबीराचा समारोप करण्यात आला. या शिबीरात लाल व पांढ-या पेशी, लिव्हर, किडनी, -हदय, थायराॅईड, कॅल्शियम, सिरम क्रिएटिनीन, टोटल कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबिन, एस पी ओ 2, हिमोग्लोबिन, इसीजी, मॅमोग्राफी, ब्लड शुगर, रक्तदाब तपासणी, वजन, उंची, ईसीजी व त्याचबरोबर खास करुन महिलांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्तन व गर्भाशयाचा कर्करोगा संदर्भात तपासणी करण्यात आली.

या शिबीरासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड, व्यवस्थापक डाॅ पी के देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल हवेली तालुका पत्रकार संघाचे प्रभाकर क्षीरसागर यांच्या हस्ते डॉ. आदिती कराड व संदीप बोडके यांच्या हस्ते डॉ पी के देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सातव यांनी केले तर, आभार अध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी मानले.

Previous articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा संपन्न
Next articleकोव्हिड काळात पत्रकार व डॉक्टरांची भुमिका ठरली महत्त्वाची – डॉ.अदिती कराड