शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात महात्मा गांधी सर्वोदय संघाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून निबंध, वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपले कौशल्य वाढीस लावावे असे आवाहन पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.अडसूळ यांनी केले.

माजी केंद्रीय कृषिमंत्री व महात्मा गांधी सर्वोदय संघाचे अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आय.क्यू.ए.सी समन्वयक प्रा.नंदकिशोर मेटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निलेश शितोळे उपस्थित होते. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विविध विभागातील ३५ विद्यार्थ्यांनी तर निबंध स्पर्धेमध्ये ३६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. वैशाली कामथे व प्रा. चारुशीला कांचन यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता फडके, स्वागत व प्रास्ताविक प्रा.शुभांगी रानवडे, टाईम कीपर म्हणून प्रा.अनुप्रिता भोर, प्रा.प्रवीण नागवडे यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.अमोल बोत्रे यांनी केले. सदर स्पर्धेसाठी प्रा.व्ही.एन.कानकाटे यांचे सहकार्य लाभले.

Previous articleफुलगाव येथे भाजपच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
Next articleविश्वराज हाॅस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली तालुका पत्रकार संघाच्या सभासदांची व कुटुंबातील सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी