फुलगाव येथे भाजपच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

महिलांंच्या वास्तववादी समस्या, केंद्र सरकारच्या विविध योजना, कृषी धोरण, ३७० कलम, भारतीय जनता पार्टीची स्थापना पूर्वी व आताचे कार्य, कार्यकर्ता- पदाधिकारी -उमेदवार -निवडणूक या विषयावर पाच सत्रात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चित्रा वाघ, पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, रोहिदास उंद्रे, प्रदिप कंद या मान्यवरांनी आपली स्पष्ट मते मांडली. भारतीय जनता पार्टी पूर्व हवेली तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालय, फुलगाव येथे हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे नियोजन हवेली भाजपाचे अध्यक्ष पै संदीप भोंडवे, कार्याध्यक्ष शामराव गावडे, सरचिटणिस गणेश चौधरी, विजय जाचक व हवेली तालुका कार्यकारणी यांनी केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी रोहिदास उंद्रे, प्रदिप कंद, दादासाहेब सातव, गणेश कुटे, प्रविण काळभोर, विकास जगताप, सुदर्शन चौधरी, सुनिल कांचन, श्रीकांत कांचन, सारिका लोणारी, पुनम चौधरी, अजिंक्य कांचन, अनिल सातव, अमोल शिवले, अमित कांचन, निलेश कानकाटे, आबासाहेब चव्हाण, ऋषीकेश शेळके, शुभम वलटे, सर्व मोर्चा, आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleबिल्डरने वहिवाटीचा बंद केलेला रस्ता महिलांनी केला मोकळा; प्रशासनाला जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा संपन्न