बिल्डरने वहिवाटीचा बंद केलेला रस्ता महिलांनी केला मोकळा; प्रशासनाला जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं

चाकण – नाणेकरवाडी येथील वहिवाटीचा दहशत निर्माण करुन जबरदस्तीने नागरिकांचा वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडत महिलांनी आज त्याने लावलेले लोखंडी पत्रे काढून रस्ता मोकळा केला.

नाणेकरवाडी येथील मिळकत गट नं. १२ व १३ मधील वर्षानुवर्ष वापरात असलेला वहिवाटीचा ५० कुटुंबांचा रस्ता बी. एम. के. डेव्हलपर्स यांनी बाऊन्सर्सचा वापर करून दहशतीने बंद केला होता. हा रस्ता खुला करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली असता महिलांशी असभ्य भाषेचा वापर करीत ही मागणी धुडकावून लावली. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यासाठी रहिवाशांच्यावतीने तहसीलदार खेड यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. त्याचबरोबर चाकण पोलीस ठाण्यात बिल्डर विरोधात रीतसर तक्रारही नोंदवली होती.

खेडचे तहसीलदार या संदर्भात सुनावणी घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासनही सहकार्य करीत नाही. त्यामुळे अखेरीस संबंधित महिलांनी आज बिल्डरने लावलेले पत्रे काढून टाकत बंद केलेला रस्ता मोकळा केला.

Previous articleअखिल भारतीय मराठा महासंघाची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
Next articleफुलगाव येथे भाजपच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न