देशाच्या राजकारणात शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली – खा.डॉ. अमोल कोल्हे

अमोल भोसले,पुणे

राष्ट्रवादी कॉगेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ वा वाढदिवसाच्या निमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी जेष्ठ नेते यांनी पवारांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केली आहेत. महाराष्ट्राच्या नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यात एक मोठा वाटा शरद पवार यांचा असल्याचं गौरोवउद्गार शिरुर लोकसभा मतदार संघाचे संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी काढले आहे.

ते पुढे म्हणाले की,पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे शरद पवार हे फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. पवार हे गेली चाळीस वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही. असा चिमटा त्यांनी काढला आहे. बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार साहेबांना भेटायला येतात, त्यामुळे नेहमीच ‘हर अर्जुन का सारथी’ हे त्यांना लागू होते.

Previous articleजेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हर्च्युअल रॅली व रक्तदान शिबीर संपन्न; हवेली ता.राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम
Next articleमराठा समाजाने वाचन,चिंतन करणे गरजेचे-राजेंद्र कोंढरे