जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हर्च्युअल रॅली व रक्तदान शिबीर संपन्न; हवेली ता.राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम

अमोल भोसले,उरुळी कांचन

तब्बल ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सर्वसामान्यांच्या विकासासाठी झटणारे शरद पवार ‘राजकारणातील चाणक्य’ अशी ओळख आहे. त्यांचे शेती आणि शेतकरी या वरील विशेष प्रेम सर्वश्रुत आहे. शेतीचा विकास व्हावा, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. शेतीवर त्यांचे निस्सीम प्रेम असले तरी शेतीबरोबरच उद्योगाचाही विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो असा विचार ते नेहमी मांडत असतात. तरी सामाजिक दूरदृष्टी विकास हा विचार आपण आत्मसात करु या असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लंवाडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महिला, युवक, विद्यार्थी सह विविध सेलच्या वतीने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण वाडेबोल्हाई येथील बोल्हाईमाता कार्यालयात संपन्न झाले. तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्त दान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, हवेली ता.रा.कॉग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रदेश युवक सरचिटणीस प्रदिप कंद, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, मा.सभापती योगिनी कांचन, तालुका महिला अध्यक्षा सुरेखा भोरडे, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष रोहिदास टिळेकर, माजी सरपंच कुशाबा गावडे, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सेलचे शिवदीप उंद्रे, मुंबई केसरी आबा काळे, जी.बी.डेव्हलपर्सचे गुलाब चौधरी, ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, सरपंच दिपक गावडे, सरपंच सुरज चौधरी, तालुका युवक अध्यक्ष योगेश शितोळे, लोचन शिवले, उद्योजक राजेश वारघडे, शिवाजी भोरडे, अशोक सातव, मंगेश सातव, विजय वाळुंज, सरपंच कविता जगताप, सरपंच विठ्ठल शितोळे, माजी सरपंच आण्णा महाडिक, जानाई डेव्हलपर्सचे सागर कांचन, शोभा हरगुडे, रोहिणी पवार, अलका गावडे, संध्या भोर, विद्यार्थी ता.अध्यक्ष सनि चौधरी, गणेश पुजारी, विजय वाळुंज, मानसिंग गावडे, नामदेव गावडे, संतोष गावडे, संदीप गोते, संदेश आव्हाळे,बाळासाहेब गायकवाड, बाजीराव भालसिंग,सुरज भोरडे, शिवांजली वाळके, सीताताई जाधव सह अनेक पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांंची उपस्थित लक्षणीय होती.

Previous articleम्हाडाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध
Next articleदेशाच्या राजकारणात शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली – खा.डॉ. अमोल कोल्हे