म्हाडाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध

अमोल भोसले, पुणे

म्हाडाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा होणार नाही असे संबंधित असलेल्या खात्याचे मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी रात्री 2.00 वाजता twitter च्या माध्यामातून याची माहिती दिली. हजारो विद्यार्थी शेकडो किलोमीटर चा प्रवास करुन रात्र एसटी स्टँड व रेल्वे स्टेशनवर काढुन हजर असताना अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याचे मनोबल खचुन त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हय़ाच्या वतिने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

या वेळी भाजपा पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमोल शिवले, भाजपा पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष प्रीतम चौधरी, संकेत पासलकर, शुभम तुपे, भाजपा हवेली विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ओंकारजी कंद, भाजपा उरुळी कांचन शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश शेळके, सिद्धांत लोखंडे, मंदार यादव, शुभम शहा, आणि सर्व परीक्षार्थी यावेळी उपस्थित होते.

Previous articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये सहा उमेदवार बिनविरोध तर १५ जागेसाठी सहकार पॅनेलचे उमेदवार जाहीर
Next articleजेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हर्च्युअल रॅली व रक्तदान शिबीर संपन्न; हवेली ता.राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम