प्राणीमित्र संघटनेच्या माध्यमातून जखमी घोड्यावर उपचार, सुधीर गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश तर निखिल कांचन यांचे विशेष सहकार्य

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील प्राणीमित्र सुधीर गायकवाड व युवा नेते निखिल कांचन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बेवारस जखमी घोड्यास मिळाले उपचार एक बेवारस जखमी घोड्याचा रेस्क्यू करण्यात प्राणिमित्रांना यश आले. घोडा जखमी अवस्थेत मागील काही दिवसा पासून पुणे- सोलापूर रोड लगत आढळत होता. बरेच दिवसांची पुढील पायाची जखम या मुळे खूपच अशक्त होता. रेस्क्यू कॉल झाल्याने सदर घटनेची माहिती मिळाली तसेच घोड्याला पुढील वैद्यकीय मदत होऊ शकली.या घोड्याच्या मदतीसाठी विषेश सहकार्य निखिल कांचन यांनी केले. टीम रेस्क्यूने अनिमल स्ट्रेस मॅनेजमेंट करत त्याला रेस्क्यू केला. पुढील उपचारा करिता बावधन मध्ये दाखल केले. या घोड्याच्या प्राथमिक तपासणीत पुढचा एक पाय फ्रॅक्चर असल्याचे लक्षात आले.

Previous articleविद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार वस्तीगृहात प्रवेश देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
Next articleआळेफाटा दरोड्यातील सहाजणांना अवघ्या 48 तासात केले जेरबंद